देश “स्फोटक” वातावरणाला सामोरे जात आहे: केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Pinarai-Vijayan.jpg)
तिरुअनंतपुरम । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
भारत देशात स्वातंत्र्य रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश “स्फोटक” वातावरणाचा सामना करीत आहे, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी केली. वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत ते बोलत होते.
केरळमधील सत्ताधारी माकपाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि विरोधी पक्ष कॉंग्रेसने यूडीएफच्या अध्यक्षतेखाली संयुक्त निषेध सभा आयोजित केली होती.
यावेळी विजयन म्हणाले की, “आपला देश गंभीर संकटाला तोंड देत आहे. हे केंद्र सरकारने मुद्दाम तयार केले आहे.”आरएसएस’चा अजेंडा हा होता की भारत धर्मनिरपेक्ष नसावा. मात्र, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि सर्व धर्मांचे आणि आस्तिकांना या देशात स्थान आहे, असे ते म्हणाले.
गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहातून ‘सीएए’ पारित झाल्यानंतर देशभरात निषेधांची मोठी लाट उसळली आहे.