Breaking-newsताज्या घडामोडी
देवेंद्र फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो – जलसंपदामंत्री जयंत पाटील
कोल्हापूर – आंतरराष्ट्रीय ब्राम्हण परिषदे कडून कोल्हापूरमध्ये ब्राम्हण अधिवेशनचे आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनाची सुरुवात जलसंपदा मंत्री जयंत पाटील , काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ब्राम्हण समाजाच्या मागण्या बाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करणार नाही अस म्हणत तिन्ही पक्षात मतभेद नसल्याचं पुन्हा पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा मला आनंद झाला आहे कारण देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार हे त्यावरून सिद्ध होतं. देवेंद्र फडणवीस यांना मी शुभेच्छा देतो. असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.