Breaking-newsताज्या घडामोडी
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/deeksha-bhoomi-nagpur-120120.jpg)
नागपूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक सण उत्सव या वर्षी साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. अशातच मोठ्या उत्साहात साजरा होणारा धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा या वर्षी रद्द करण्यात आला आहे. नागपूरमधील कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेतला असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीने सांगितले आहे.
धम्म चक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी १४ ऑक्टोबरला बौद्ध अनुयायी नागपुरात मोठ्या संख्येने जमतात. १४ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमीवरचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचीव सुधीर फुलझेले यांनी सांगितले आहे.