दिल्लीत करोना विषाणूचा आणखी एक रुग्ण
नवी दिल्ली | महाईन्यूज
दिल्लीतील एका व्यक्तीच्या प्रवास इतिहासानुसार तो थायलंड व मलेशियाला जाऊन आला असून त्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे भारतातील एकूण निश्चित रुग्णांची संख्या आता ३१ झाली आहे. दिल्लीतील हा तिसरा रुग्ण आहे. त्याची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. आरोग्य खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वच देशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता आरोग्य तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.
तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून एकूण ३० विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. करोना विषाणूवर एक दिवसाचा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयोजित केला होता. त्यात विविध राज्यांचे २८० आरोग्य अधिकारी उपस्थित होते, त्यात रेल्वे, संरक्षण व निमलष्करी दलांच्या रुग्णालयांच्या आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आतापर्यंतच्या ३० रुग्णांत दिल्लीतील मयूरविहारचा एक, आग्रा येथील त्याचे सहा नातेवाईक, गुरगाव येथील पेटीएम कर्मचारी (रा. पश्चिम दिल्ली) यांचा समावेश असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाझियाबाद येथे सापडलेल्या रुग्णावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबाद येथेही एक रुग्ण सापडलेला आहे त्याला वेगळे ठेवण्यात आले आहे. इटलीचे सोळा पर्यटक व त्यांचा भारतीय वाटाडय़ा (पर्यटन मार्गदर्शक) यांचाही रुग्णात समावेश आहे.
- ‘Yes बँके’च्या माजी संचालकांच्या घरावर ईडीची धाड, लुकआऊट नोटीस जारी
- कोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |