breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

दिल्लीच्या आंदोलनात आता मोबाईल चार्जिंगचा लंगर

मुंबई – दिल्लीत पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेशातील शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. हजारो शेतकरी आपला विरोध दर्शवण्यासाठी एकवटलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबाही मिळत आहे. यात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय मल्ल खलीनेही आपला पाठिंबा असल्याचे सांगतले. शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्याने आपले म्हणणे मांडले होते. त्याचा इन्स्टाग्रामवर त्याने व्हिडिओ शेअर केला होता.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला द ग्रेट खलीचा पाठिंबा

यातच दिल्लीतील शेतकऱ्यांना एक अनोखी मदत मिळताना दिसत आहे. या किसान बांधवांना येथील कंपनीने मोफत मोबाईल चार्जिंग सुविधा पुरविली आहे. टी.जी. सोलार कंपनीने ही व्यवस्था करून दिली आहे. या सुविधेचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेत आहेत.  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button