breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, उद्या कोरोना टेस्ट होणार
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे. अचानक ताप आणि घशात त्रास सुरू झाल्याने त्यांची उद्या कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच, तब्येत कुरकुर करत असल्यामुळे खबरदारी म्हणून केजरीवाल यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते.
सर्व मीटिंगदेखील त्यांनी रद्द केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी काही बैठकींना उपस्थिती लावली होती. आता नेमकी त्यांचा अहवाल काय येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.