breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

दारूचा ग्लास नीट भर म्हणून त्याने आणला हातोडा…अन

नागपूर | देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. खून, हत्याच्या घटनांनी शहर हादरून गेले आहे. शहरातील साईनगर भागात दारूचा ग्लास भरण्याच्या वादातून दोघा मित्रांनी एकाची हातोड्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

एका मराठी वृत्दितपत्लेराने दिलेल्या वृत्तानुसार, साईनगर भागात 11 जून रोजी ही घटना घडली आहे.  काल्या ऊर्फ सुरेंद्र सुखदेव तभाणे (वय 32) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचे मित्र जल्या उर्फ दीपक किसनलाल सोनी आणि शेख जलील ऊर्फ बाबा पन्नी या दोन आरोपींनी त्याची हातोड्याने ठेचून हत्या केली.  मृत तरुण सुरेंद्र तभाणे हा आठवडी बाजारात हॉटेलचा व्यवसाय करत होता.  गुरुवारी 11 जून रोजी त्याचे मित्र  बाबा पन्नी, जल्या उर्फ दीपक सोनी या दोघांसोबत घरी दारू पार्टी करत होते. सकाळपासून या तिघांची दारू पार्टी रंगली होती. दारूच्या नशेत तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे घरातच तिघांनी राडा घातला होता. त्यामुळे सुरेंद्र याच्या पत्नीने आरडाओरडा केल्यामुळे तिघेही जण तिथून बाहेर पडले. घरापासून काही अंतर दूर गेल्यावर मोकळ्या मैदानात पुन्हा एकदा तिघे दारू पिण्यासाठी बसले. त्यानंतर दारूचा ग्लास भरण्यावरून सुरेंद्र तभाणे आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. रागाच्या भरता सुरेंद्र घरात पळत गेला आणि दोघांना मारण्यासाठी हातोडा घेऊन आला. परंतु, बाबा पन्नी आणि दीपक सोनी या दोघांनी त्याच्या हातातून हातोडा हिसकावून घेतला. त्यानंतर झालेल्या झटापटीतून दोघांनी सुरेंद्रवर हातोड्याने सपासप वार केले.  रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुरेंद्रचा मृतदेह सोडून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे सुरेंद्रचा जागीच मृत्यू झाला.  सुरेंद्रच्या हत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली आणि पंचनामा केला. सुरेंद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.  शांतीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button