Breaking-newsताज्या घडामोडी

तेज प्रताप यादवांना जेडीयूचा शह, दुरावलेली पत्नी ऐश्वर्याला विरोधात तिकीट देण्याचा मेगाप्लॅन

पाटणा | बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव हसनपूरमधून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे हसनपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. मात्र या मतदारसंघातील लढतीत ‘फिल्मी रंगत’ वाढणार आहे. याचं कारण म्हणजे तेज प्रताप यांच्याविरोधात त्यांची दुरावलेली पत्नी ऐश्वर्या राय हिला जनता दल युनाटडेट तिकीट देणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजप-जेडीयू यांची आघाडी मजबूत असून हसनपूरची जागा आपल्या पदरात पाडून तेजप्रताप यांना काटशह देण्याचा जेडीयूचा प्रयत्न आहे. ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांनी आधीच राजदला रामराम ठोकून जेडीयूत प्रवेश केला आहे.

ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील संबंध लग्नानंतर काही दिवसातच बिघडले आणि घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. मात्र आधी घरात आणि नंतर कोर्टात आमनेसामने आलेले पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणातही समोरासमोर उभे ठाकले, तर निवडणुकीत रंगत वाढेल. संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागेलच, मात्र यादव आणि राय कुटुंबाची प्रतिष्ठाही पणाला लागेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button