breaking-newsताज्या घडामोडी

‘तान्हाजी’ चित्रपटाचे उदयनराजेंनी केले काैतुक

पुणे |महाईन्यूज|

‘तानाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे कौतुक सर्वत्र सुरु असताना आता माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही या चित्रपटाच्या टीमचे कौतुक करत यापुढेही आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

उदयनराजेंनी ट्विट करत म्हटले आहे, की “तानाजी द अनसंग वॉरीयर” या चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अजय देवगण यांची प्रशंसा करावी एवढी कमीच आहे. त्यांना पुढील वाटचालीस आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तसेच यापुढेही ते आपल्या स्वराज्याचा इतिहास संपूर्ण जगाला दाखवत राहतील हीच अपेक्षा.’ या ट्विटसह त्यांनी अजय देवगन, काजोल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकरला टॅग केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button