तब्बल अकरा हजार मुलांनी एकसुरात सादर केले राष्ट्रगान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/childrens.jpg)
नाशिक | महाईन्यूज
वंदे मातरम्, विजयी विश्व तिरंगाा प्यारा अशी अनेक राष्ट्रभक्तीपर गिते अकरा हजार मुलांनी एकाच सुरात सदर केली आणि राष्ट्रभक्ति भक्ती जागविली. झेप सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता. गेल्या सहा वर्षांपासून संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्यनिमित्ताने हा उपक्रम राबविण्यात येतो आणि शहरातील विविध शाळांमधील मुले त्यात सहभागी होत आहेत.
आज सकाळी पंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विविध शाळांमधील अकरा हजार मुले सहभागी झाली होती. यावेळी विजयी विश्व तिरंगा प्यारा या गीताबरोबरच साने गुरूजींच्या खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ही रचना, मंगेश पाडगावकर यांची तु नव्या जगाची आशा, जय जय भारत देश त्यानंतर संत तुकडोजी महाराज यांची या भारतात बंधूभाव नित्य वसु दे आणि शेवटी कवी वसंत बापट यांची हम युवकों का नारा है, भारत हमको प्यारा है ही गीते तालासुरात सादर केलेली आहे.