डोनाल्ड ट्रम्प यांची एच-1 बीसह अनेक व्हिसांवर बंदी
![Another blow to Donald Trump; Snapchat has banned Ban permanently](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Donald-trump-2.jpg)
न्यूयॉर्क| अमेरिकेने भारतीय विद्यार्थी व व्यावसायिकांना धक्का दिला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोजगारावर आधारित अनेक अमेरिकी व्हिसा प्रोग्रॅम्सवर तात्पुरती बंदी घातली. त्यांनी एच-१बी व्हिसासह एल-१ व इतर तात्पुरत्या राेजगारांचे व्हिसा स्थगित ठेवण्याचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला. यामुळे अमेरिकतील अनेक भारतीयांची अडचण होणार आहे.
कुणावर काय परिणाम? : विविध अमेरिकी कंपन्यांत येऊ पाहणारे व्यावसायिक लोक ऑक्टोबरमध्ये येऊ शकणार नाहीत. संशोधक विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही. कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय बदल्यांवर परिणाम होईल. ज्यांच्या व्हिसाची मुदत एप्रिलमध्ये संपणार होती त्यांना मुदत वाढवून मिळेल. या नियमातून डॉक्टर, नर्स यांसह विविध सेवा देणाऱ्यांना सूट असेल.
दरम्यान, स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या घोषणेनुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी टाकलेला हा राजकीय डाव असल्याचे मानले जात आहे. यावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली.