Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं, परस्पर पुरला मृतदेह
![धक्कादायक! २७ दिवसांच्या बाळाचा भिंतीवर डोकं आपटून खून; सख्ख्या आईनेच ‘या’ कारणामुळे केलं कृत्य](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/murder-1.jpg)
बीड | बीड जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर नेकनूर येथील मांडवखेल येथे पती-पत्नीच्या भांडणात सासूने मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयानं सासूची हत्या केली आहे. जावयानं सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निर्घृण खून केला आहे. एवढंच नाही तर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. हा धक्कादायक प्रकार 13 दिवसानंतर उघडकीस आला आहे. पहिली खुनाची घटना अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे घडली आहे. सोपान मुसळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोपान यांचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. बरदापूर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. असून खुनाचं कारण अद्याप समजू शकले नाही.