breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जगातील आठ आश्चर्यांत ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा समावेश

नर्मदा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि नर्मदेच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेला ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ पुतळ्याचा जगातील आठ आश्चर्यांत समावेश करण्यात आलाय. आठ देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशननं (SCO) ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’चा जगातील आठ आश्चर्यांपैंकी एक घोषीत केलंय. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या सदस्यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तझाकिस्तान, रशिया आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहेत. गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया स्थित स्टॅच्यु ऑफ युनिटीला SCO च्या आठ आश्चर्यांत स्थान मिळणं ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जगातील आठ श्रेष्ठ पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश झाल्यानं इथं पर्यटनालाही वाव मिळेल. तसंच केवडियाच्या स्थानिकांनाही रोजगाराच्या अनेक संधी उत्पन्न होतील. SCO चे सदस्य देशही स्टॅच्यु ऑफ युनिटीचा प्रचार करतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button