जगभरात 24 तासात 4 हजार 883 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू |Corona Virus Updates Worldwide
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/20.jpg)
नवी दिल्ली | ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात घातलेले थैमान कायम आहे. कालच्या एका दिवसात (बुधवार 1 एप्रिल) आतापर्यंतचे 24 तासातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी गेले आहेत. जगभरात एकाच दिवशी तब्बल 4 हजार 883 जणांना ‘कोरोना’मुळे जीव गमवावा लागला. जगात आतापर्यंत ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडाही 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे.
‘कोरोना’मुळे जगभर अनेक देशांची वाताहत झाली आहे. काल एका दिवशी जगात 4 हजार 883 रुग्णांचे प्राण गेले. जगात ‘कोरोना’मुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 47 हजार 192 वर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्याही 10 लाखांच्या जवळ जात आहे. कालपर्यंत जगात 9 लाख 35 हजार कोरोनाग्रस्त झाले आहेत. अमेरिकेतही एका दिवसातल्या सर्वाधिक ‘कोरोना’बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेत काल 1049 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. काल तब्बल 26 हजार 473 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. अमेरिकेतल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. यूएसएमध्ये 2 लाख 15 हजार कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडाही 5 हजार 102 वर गेला आहे.
अमेरिकेतही एका दिवसातल्या सर्वाधिक ‘कोरोना’बळींची नोंद झाली आहे. अमेरिकेत काल 1049 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. काल तब्बल 26 हजार 473 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. अमेरिकेतल्या एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या पार गेला आहे. यूएसएमध्ये 2 लाख 15 हजार कोरोनाग्रस्त असून मृतांचा आकडाही 5 हजार 102 वर गेला आहे.