breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गुजरात : धावत्या ट्रेनमध्ये भाजपाच्या माजी आमदाराची गोळी घालून हत्या
गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार जयंती भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. जयंती भानुशाली सयाजी नगरी ट्रेनमधून भुजहून अहमदाबादला चालले होते. त्यावेळी ही घटना घडली.
ट्रेन मालिया येथे पोहोचली असता आरोपींनी एसी डब्ब्यात घुसून भानुशाली यांच्यावर गोळया झाडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. भानुशाली गुजरात भाजपाचे माजी उपाध्यक्ष होते तसेच ते कच्छच्या अबडसा विधानसभा मतदारसंघातून २००७ ते २०१२ दरम्यान आमदारही होते.