गंगनम स्टाईल डान्स नुडल्स बनवते ही तरूणी; पहा हा भन्नाट व्हिडिओ
स्ट्रीट फूड बनवणाऱ्या एक तरुणीची गंगनम स्टाईल डान्स करता करता नुडल्स बनवण्याची पद्धत पाहून सोशल मीडियावर नेटकरी अक्षरशः आवाक झाले आहेत. हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेकांनी या तरुणीच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.
या व्हिडिओत एक जपानी तरुणी रस्त्यावर नुडल्सची गाडी चालवताना दिसते. या ठिकाणी मोठ्या गॅसच्या ज्वाळांवर ती हटके पद्धतीने एका कढईत नुडल्स बनवते. साऊथ कोरियन संगीतकार साय याचं एक प्रसिद्ध गंगनम नावाचं गाण आहे, या गाण्यावर ताल धरत मोठ्या चमच्याला कढईच्या कानात अडकवत ती कढई वेगाने गोल फिरवत अत्यंत कुशलपणे डान्स करीत नुडल्स तयार करते. तिची ही अनोखी पद्धत पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे आणि तिचे फोटो, व्हिडिओ घेत असल्याचे दिसत आहे.
सुरुवातीला हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो इतरही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विविध प्रकारे या अनोख्या कलाकृतीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.