कोरोना संक्रमित झाल्यावर पेशी कशा दिसतात, संशोधकांनी जारी केले फोटो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/corona_1599990534.gif)
कोरोना संक्रमित झाल्यानंतर आपल्या पेशी कशा दिसतात, याचे काही फोटो अमेरिकन संशोधकांनी जारी केले आहेत. संशोधकांनी लॅबमध्ये मानवाच्या ब्रॉन्कियल एपिथीलियल पेशींमध्ये कोरोना इंजेक्ट केला. यानंतर पेशींमध्ये पसरणाऱ्या व्हायरसचे फोटो कॅप्चर केले. पेंशींमध्ये गुलाबी रंगाची संरचना कोरोना व्हायरसची आहे. हा कोरोना व्हायरस पेशींमध्ये गुलाबी गुच्छाप्रमाणे दिसतो.
अमेरिकेतील यूएनसी स्कूल ऑफ मेडिकल लेबोरेट्री ऑफ कॅमिल एहरेच्या रिपोर्टनुसार, हे फोटो श्वसन नलीकेतील संक्रमणाचे आहेत. कोरोना व्हायरस श्वसन नलीकेत कसा पसरतो, याचा अभ्यास यातून केला जातो. हे फोटोज न्यू इंग्लैंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत.
रिसर्चर कॅमिलनुसार, मानवाची ब्रॉन्कियल एपिथीलियल पेशींमध्ये कोरोना इंजेक्ट केल्यानंतर 96 तास लक्ष ठेवण्यात आले. याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून पाहण्यात आले. इमेजमध्ये रंगांना सामील करुन व्हायरसचा चांगला फोटो दाखवण्यात आला आहे.
फोटोंमध्ये निळ्या रंगात दिसणाऱ्या संरचनेला सीलिया म्हणतात. याच्या मदतीने फुफ्फुसातून म्यूकस बाहेर पडतो. व्हायरसच्या संक्रामक प्रकाराला वायरियॉन्स म्हणतात. हा लाल रंगाच्या गुच्छाप्रमाणे दिसतो.