कोपर्डी खटला: कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/08/kopardi.jpg)
नवी दिल्ली : कोपर्डी खटल्यात सरकारची बाजू मांडत असलेले विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांच्यासह इतर पाच जणांना बचाव पक्षाचे साक्षीदार करण्यासाठी आरोपी संतोष गोरख भवाळ यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
आरोपी भवाळ याने अॅड. उज्जवल निकम यांच्यासह रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे डायरेक्टर, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांना साक्षीदार म्हणून बोलविण्याची मागणी जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर केली होती. मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. या विरोधात आरोपी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेला होता. औरंगाबाद खंडपीठानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने केवळ एकाच साक्षीदाराची उलट तपासणी केल्याने त्रास झाला. त्यामुळे इतरही पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र आरोपीची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.