breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची कोरानावर मात

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. नितीन गडकरी यांनी स्वत: ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. नितीन गडकरी हे कोरोनामुक्त झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नितीन गडकरी यांना गेल्या दोन आठवड्यापूर्वी अशक्तपणा जणावत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.

नितीन गडकरी यांना 16 सप्टेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्यांनी स्वत:चे विलगीकरण केले होते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर नितीन गडकरी यांनी आज पुन्हा ट्विट करत कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली आहे. “आपणांस मला हे सांगताना आनंद होत आहे की, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर मी कोरोनामधून पूर्णपणे बरा झालो आहे” अशा आशयाचे ट्विट स्वत: नितीन गडकरी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button