breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

किम जोंग यांनी तयार केले सर्वात धोकादायक न्यूक्लिअर बॉम्ब, UNने दिला इशारा

उत्तर कोरियाने हुकुमशाह किम जोंग उन यांच्या नेतृत्वात छोटे-छोटे मात्र अत्यंत धोकादायक असे अण्वस्त्रे विकसित केली आहेत, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. ही शस्त्रे आकाराने फारच लहान आहेत, त्यामुळे त्यांची वाहतुक सोपी होते. मात्र शस्त्रे अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक आहेत.

यूएनच्या तपास यंत्रणेला असे आढळले आहे की उत्तर कोरिया सतत बॅलिस्टिक मिसाइलचा साठा वाढवत आहे. यूएनएससीच्या अहवालात असे म्हटले आहे की असंख्य निर्बंध असूनही अण्विक इंधन उत्तर कोरियापर्यंत पोहोचत आहे. यासाठी रशिया, चीन आणि इराणसारख्या देशांवर संशय आहे.

उत्तर कोरियाची सरकारी एजन्सी KCNAच्या म्हणण्यानुसार देशाने अण्वस्त्रांची नवीन श्रेणी तयार केली आहे. हे बॉम्ब इतके छोटे आहेत की ते बॅलिस्टिक मिसाइलाही उडवू शकते. टाइम्सच्या वृत्तानुसार उत्तर कोरियाने त्यांची समुद्रात चाचणी केली.

यापूर्वी KCNAने असा असा दावा केला होता की उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब बनविला होता जो देशाच्या नवीन इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइलतून उडवला जाऊ शकतो. याआधीही उत्तर कोरिया हायड्रोजन बॉम्ब बनविण्याचे काम करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की त्यांचे नेते किम जोंग उन यांनी अण्वस्त्र शस्त्रे संस्थेत अशा उपकरणांची तपासणी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button