breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश! लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात करीरी येथे आज (17 ऑगस्ट) दशतवाद्यांसोबत  झालेल्या चकमकीत दोन जवानांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाले होते. यानंतर काही तासातच सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलेलं आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातलेला होता. संयुक्त शोध मोहिमेत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली होती.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले होते. यानंतर प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. यातील एकाची ओळख लष्कर ए तोयबाचा (LeT) टॉप कमांडर सज्जाद उर्फ हैदर अशी झालेली आहे. पोलीस महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा हात होता. यातील दोघे ठार झाल्याने ही पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कामगिरी बजावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button