Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काश्मीरमध्ये कलम ३७१ लागू करण्याचा विचार नाही- केंद्रीय गृहमंत्रालय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/kashmir-army-frame-new.jpg)
महाईन्यूज |
ईशान्येकडील राज्यांप्रमाणे जम्मू काश्मीरला कलम ३७१ लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याच्या प्रसारमाध्यमातील बातम्यांचा केंद्रीय गृहमंत्रालयाने इन्कार केलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७१ लागू करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही दूरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रांनी दिलेले वृत्त चुकीचे असल्याचे सांगून गृहमंत्रालयाने म्हटले आहे, की जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७१ लागू करण्याचा कुठलाही विचार झालेला नाही.
प्रसारमाध्यमांच्या बातम्यात असे म्हटले होते, की जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७१ लागू करण्यात येणार असून त्यासाठी तेथील कायदा खात्याशी संपर्क साधण्यात आला आहे,लडाखमध्येही हे कलम लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. सध्यातरी हा प्रस्ताव सल्लामसलत पातळीवर ठेवलेला आहे.