औरंगाबादमध्ये आणखी ५१ नवे करोनाबाधित; एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus-1.jpg)
औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आज आणखी ५१ करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या १०७३ झाली आहे. तर आज एका व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या ३५ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे सव्वा तीनशे रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सापडलेल्या करोनाबाधितांमध्ये रोहिदास नगर येथील १, शिवशंकर कॉलनी १, जाधववाडी १, जटवाडा रोड १, हिमायत बाग १, किराडपुरा ४, पुंडलिक नगर १, मुकुंदवाडी १, नारेगाव १, जयभीम नगर १, संजय नगर १, रहीम नगर १, कैलास नगर १, गादल नगर १, सादात नगर (गल्ली नं. सहा) येथे ४, शिवनेरी कॉलनी १, विधिया नगर (सेव्हन हिल) १, बायजीपुरा (गल्ली नंबर २५) ४, दुर्गा माता कॉलनी (न्याय नगर) १, मकसूद कॉलनी १, जाधववाडी १, (गल्ली नं. २३) बायजीपुरा २, (गल्ली नं. ३) बायजीपुरा १ , सातारा गाव ३, आदर्श कॉलनी, गारखेडा ३, गारखेडा परिसर १, मित्र नगर १, मिल कॉर्नर १, शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी १, मुकुंदनगर, मुकुंदवाडी १ व इतर ठिकाणचे ४ आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये १७ महिला व ३४ पुरुषांचा समावेश असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.