breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एमटीएनएल आपल्या मालमत्तांची करणार विक्री

मुंबई | महाईन्यूज

आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन न देऊ शकलेल्या व हजारो कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देणा-या एमटीएनएलने आपल्या मुंबई व दिल्लीतील मालमत्ता विकण्याचे ठरविले आहे, त्यातून २३ हजार कोटी रुपये उभे राहतील, असा दावा कंपनीचे कंपनीचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी व्यक्त केलेला आहे. दूरसंचार क्षेत्रातील एमटीएनएल व बीएसएनएल या दोन्ही कंपन्यांतील सुमारे ९0 हजार कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारल्यानंतर मालमत्ता विकून कर्जमुक्त होण्याचे व कंपन्या नफ्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

दिल्ली व मुंबईतील ६,२00 कोटींच्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव एमटीएनएलने सरकारला दिला आहे. त्याला संमती मिळाल्यानंतर या मालमत्ता विकून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या कर्मचा-यांची सर्व देणी दिली जातील, असे सुनीलकुमार यांनी सांगितले आहे. दोन्ही शहरांतील काही मालमत्ता विकून २३ हजार कोटी उभे राहतील. त्यातून सर्व देणी व कर्ज फेडली जातील आणि त्यानंतर एमटीएनएल पुढील आर्थिक वर्षात नफ्यामध्ये येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. स्वेच्छानिवृत्तीमुळे कंपनीचे दरवर्षी १,७00 कोटी रुपये वाचतील, असेही ते म्हणाले. आतापर्यंत एमटीएनएलच्या १४ हजार ३८७ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरून दिले आहेत. त्यामुळे कंपनीत सुमारे ४ हजार कर्मचारीच राहतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button