Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीराष्ट्रिय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा ः दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी
नागपूर ः दिशा सालियन मृत्यू प्रकरणासाठी SIT मार्फत चौकशी होणार अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी हे प्रकरण दोन्ही सभागृहात लावून धरत त्याची SIT स्थापन करत चौकशी करण्याची मागणी केली. दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधानसभेत भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी उपस्थित केले. ज्यानंतर विधानसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. याप्रकरणावरून विधासभेचे कामकाज जवळपास पाच वेळी तहकूब करण्यात आले. फडणवीस यांच्या घोषणेमुळे आता ठाकरे गटातील माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे





