उद्यापासून 30 रेल्वे सुरू, दिल्लीहून 15 शहरे जोडणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/railway-2-696x435.jpg)
नवी दिल्ली | लॉकडाऊनमुळे देशभर अडकून पडलेल्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. रेल्वे १२ मेपासून हळूहळू सेवा सुरू करणार आहे. मंगळवारी विशेष सुविधेनुसार ३० राजधानी रेल्वे (१५ जोडी) सुरू होतील. आरक्षण सोमवारी सायंकाळी ४ पासून केवळ आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल. रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकिटासह सर्व बुकिंग काऊंटर बंद असतील. या रेल्वेत पँट्री असणार नाही. पॅक भोजन मिळेल. दिल्लीहून दिब्रुगड, आगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई, तिरुवानंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मूतावीसाठी या रेल्वे असतील.
रेल्वेच्या सूत्रांनुसार, कोरोना केअर सेंटरसाठी २० हजार बोगी राखीव आहेत. याशिवाय प्रवासी मजुरांसाठी रोज सुरू असलेल्या ३०० रेल्वे यापुढेही चालू राहतील. यानंतर उरलेल्या बोगींचा अंदाज घेऊन देशभर विशेष रेल्वेे चालवल्या जाणार आहेत. एअर इंडियाच्या ५ वैमानिकांना संसर्ग झाला आहे. पाचही जणांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. हे उड्डाणाच्या ७२ तास आधी केल्या जाणाऱ्या प्री-फ्लाइट टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले. सर्व मुंबईचे आहेत. एअर इंडिया लॉकडाऊननंतर अनेक देशांत कार्गो उड्डाणे करत आहेत. हे वैमानिक दिल्लीहून चीनच्या ग्वांग्झोला गेले होते.