Breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rajesh-Tope-3.jpeg)
अमरावती | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण, वाढीव बिलं, बेडची कमतरता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभारामुळे भाजप युवा मोर्चाने अशाप्रकारे आंदोलन केलं. त्यामुळे राजेश टोपेंना रस्त्यात गाडी थांबवत त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rajesh-Tope-1.jpeg)
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अध्यक्ष प्रणित सोनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य शासनाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोरोना काळात उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून भोंगळ कारभार लवकरात लवकर बंद व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमच्या मागण्या लवकरात लवकर नाही पूर्ण झालं तर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन अध्यक्ष प्रणित सोनी यांनी केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Rajesh-Tope-2-1.jpeg)