आम्हाला शिकवू नका,प्रसाद यांचा वोडाफोनला टोला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Ravishankar-Prasad.jpg)
मुंबई / स्पेक्ट्रम परवाना शुल्क आणि ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूपोटी सरकारला द्यावा लागणाऱ्या महसुलामुळे अडचणीत आलेल्या वोडाफोन-आयडिया कंपनीने भारतातील व्यवसाय गुंडाळण्याचे संकेत दिले होते, त्यावर प्रथमच भाष्य करताना दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कोणीही सरकारला शिकवू नये, असा टोला लगावला आहे. टाइम्स नेटवर्कच्या ‘इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शुक्ल भरण्यासंदर्भात सरकारने दिलासा दिला नाही तर भारतातून व्यवसाय बंद करण्याची जाहीर व्यक्तव्ये मागील महिनाभरात व्होडाफोनच्या प्रमुखांनी केली होती. या व्यक्तव्यांचा प्रसाद यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, अशा प्रकारची वक्तव्ये योग्य नाहीत. सरकारचे धोरण सुस्पष्ट आणि पारदर्शक आहे. सरकारने सर्वांना खुलेपणाने व्यवसाय करण्याची संधी दिली आहे. भारत हा सार्वभौम देश आहे. त्यामुळे कोणीही सरकारला शिकवू नये, असे प्रसाद यांनी ठणकावले.