Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिवेशनात शहरातले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न; आमदार अमित गोरखे

पिंपरी | नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनात गोरख यांनी नव्या उद्योजकांसह महिलांकरिता मुद्रांक शुल्क सवलत, जर्मन, फ्रेंच अशा परकीय भाषांसाठी जर्मनीसोबत करार, शिक्षण सेवकांचे रखडलेले मानधन, बिंदू नामावलीनुसार मागास प्रवर्गातील सहायक पोलीस निरीक्षकांना बढती, पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील महत्त्वाच्या विशेषत: युवक, युवती, महिला आणि पोलिसांच्या मूळ मागण्यांवर आणि त्यावरचे उपाय मांडून गोरखे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

हेही वाचा       –        खर्गे यांच्या अब्रूची लक्तरं टांगली संसदेच्या वेशीवर !

राज्यभरातील तालुक्यांत शववाहिका ,दीक्षाभूमीकरिता आणखी ५७ एकर जागा मिळावी.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अटी शिथिल करण्याची मागणी देखील गोरखे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button