breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
आमदार मानसिंगराव नाईक यांचेकडून वारणा नदीस आलेल्या पुराची पाहणी
शिराळा | प्रतिनिधी
देववाडी (ता. शिराळा) येथे वारणा नदीस आलेल्या पुराच्या पाण्यामुळे खचलेल्या गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पहाणी केली, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
तसेच वारणा नदीवर सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा मांगले-काखे या नवीन पुलासाठी केंद्रीय रिजर्व फंडातून १३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याच्या कामाबाबत व नियोजनाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, असेही आमदार नाईक यांनी म्हटले आहे.
देववाडी रस्त्याला संरक्षक भिंत उभारण्याची सूचना केली. यावेळी उप अभियंता अतुल केकरे, अभियंता पी. व्ही. कदम, माजी सरपंच सचिन नांगरे, प्रभाकर, विलास व रणजीत खोत, विष्णू, शरद व पोपट नांगरे उपस्थित होते.