Breaking-newsताज्या घडामोडी
आमदार महेंद्र दळवींना कोरोनाची लागण;अधिवेशनाला न जाताच फिरले माघारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/mahendra-dalvi-aalibag.gif)
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोविड-19 चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार दळवी यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवस रोज शंभरी पार रुग्ण सापडत आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज (7 सप्टेंबर) ते मुंबईत सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकरिता निघाले होते. धरमतर येथे पोहोचल्यावर त्यांना त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. तेथूनच ते माघारी फिरले आणि क्वारंटाईन झाले आहेत. पुढचे 10 दिवस ते होम क्वारंटाईन राहणार आहेत.