आज ‘रोझ डे’…💞
१४ फेब्रुवारीला येणा-या व्हॅलेंटाईन डे आधी एक आठवडा प्रेमाचा हा सप्ताहच साजरा करण्याचं फॅड गेली काही वर्षे सुरू आहे. या सप्ताहात पहिला येणारा दिवस म्हणजे रोझ डे. ७ फेब्रुवारीला प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जोडण्यासाठी या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात.
व्हॅलेंटाईन डेची सुरुवात १४ व्या शतकात झाली. खरं तर त्याही पेक्षा आधी म्हणजे तिसऱ्या शतकात ए. डी. सम्राट क्लॉडियस याने दोन माणसांना मारुन टाकण्याचा आदेश दिला होता. त्या दोघांचेही नाव व्हॅलेंटाईन होते. त्यानंतर बहिष्कार टाकलेल्या कपल्सचे संत व्हॅलेंटाईनने लग्न करुन दिल्याबद्दल त्याला शिक्षा देण्यात आली होती. त्याच्या या बलिदानाची खूप चर्चा झाली आणि मग प्रेमाचा उत्सव सुरु झाला. गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामुळे व्हेलेंटाईन वीकची सुरुवात ‘रोझ डे’ ने होते.
हा दिवस साजरा करण्यामागे असेही सांगितले जाते महाराणी व्हिक्टोरियाच्या काळात आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोकांनी एकमेकांना लाल गुलाब देण्याची परंपरा सुरु केली. त्यामुळे गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले.
लाल गुलाब प्रेमाचं प्रतिक, पिवळं गुलाब मैत्रीचं प्रतिक,पांढरं गुलाब शुद्धतेचं प्रतिक, गुलाबी गुलाब धन्यवाद म्हणण्यासाठी, आपल्याला आवडणारी व्यक्ती असल्यास जांभळं गुलाब, तुमचा साथीदार तुमच्यासोबत असल्याचा तुम्हाला गर्व असेल तर नारंगी रंगाचं गुलाब असं वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचं वेगवेगळं महत्व आहे.
आपल्या प्रेयसी आणि प्रियकराजवळ भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमाचं प्रतिक असलेलं लाल गुलाब द्या. आपल्या आप्तस्वकीयांची माफी मागायची असेल तर पांढरं गुलाब भेट द्या.
प्रेमीयुगुल तर रोझ डे साजरा करणारच आहे. मात्र, वेगळ्या पद्धतीने रोझ डे साजरा करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. हा दिवस हटके बनवण्यासाठी पुष्पगुच्छ घरी पाठवून सप्राइज द्या, मनमोहक ठिकाणी फिरायला जा रोमॅटिंक संगीताच्या साथीत जोडीदाराला रोज द्या. कल्पनेच्या पलिकडे जाऊन साजरा करा यावर्षीचा रोज डे.