अल्पवयीन मुलीचा जळालेला मृतदेह आढळला
![Shocking! Paracommando Nikhil Burande from Ballarpur commits suicide at Agra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/DEAD-BODY-Frame-copy-2.jpg)
पश्चिम बंगाल | महाईन्यूज
दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील कुमारगंज भागात सोमवारी रस्त्याखालच्या नालीत १७ वर्षांच्या मुलीचा जळालेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकले गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे. मृतदेहावर जखमा झालेल्या दिसत होत्या. या घटनेत गुंतले असल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक झाल्याचे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक देबर्षी दत्ता यांनी सांगितलेले आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे आम्ही सांगू शकू, असे त्या म्हणाल्या आहेत. रविवारी दुपारी ती जवळच्या दुकानाकडे जात असताना बेपत्ता झाली, असे तिच्या भावाने सांगितले. गुन्हेगार पकडले गेले नाहीत तर मोठे आंदोलन करण्याची धमकी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक खासदार सुकांता मजुमदार यांनी दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे कुमारगंजचे आमदार तोराफ हुस्सेन यांनी सांगून तटस्थ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केलेली आहे.