breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत फायझर कंपनीच्या कोरोना व्हॅक्सिनला परवानगी

वॉशिंग्टन – जगभरात आता कोरोनावरील प्रतिबंध ठरणार लस येऊ घातली आहे. जगभरातील विविध देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून आता अमेरिकतही लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसीत केलेल्या लसीला आपत्कलिन वापरास परवानगी दिली आहे.

वाचा :-Farmer Protest – शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; पीयुष गोयल यांचे गंभीर आरोप

चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रसार झाला. जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. सुरुवातीच्या काळापासूनच अमेरिकेतही कोरोनाने आपले हातपाय पसरले. कोरोना रुग्णांच्या संख्येत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. नियमित वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यातच, यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्थाही चांगलीच ढासळली. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

अमेरिकेने कोरोनावरील लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही १०० दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीनं फायझरच्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. या मुद्दावर झालेली बैठक तब्बल आठ तास सुरु होती. बैठकीदरम्यान एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी १७ विरूद्ध ४ मतांनी लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली. तर एक सदस्या या प्रक्रियेत सहभागी झाला नव्हता.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे, असं एका तज्ज्ञानं सांगितलं. यापूर्वी फायझरच्या लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियानं मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीनं परवानगी मागितली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button