breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेतील नव्या व्हिसा नियमांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना फटका

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत व्हिसासंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. तेव्हापासून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक पेचप्रसंगाच्या काळात निर्वासित होण्याची आणि कर्जाची परतफेड करणे, कोविड -19 चा धोका, सेमिस्टरचा अभ्यास सुटणे आणि पुन्हा कॉलेजमध्ये जाता न येण्याची भीती सतावत आहे.

यूएस इमिग्रेशन ऑथोरिटीने जाहीर केले आहे की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे परदेशी विद्यार्थ्यांना देशामधून बाहेर पडावे लागेल किंवा निर्वासित होण्याच्या धोक्याचा सामना करावा लागू शकतो. ज्या विद्यापीठांनी या सेमिस्टरमध्ये पूर्णवेळ ऑनलाईन वर्ग आयोजित केला आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो. यामुळे शेकडो भारतीय विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.

हार्वर्ड युनिव्हर्सिटी, मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) आणि जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी या आदेशावर स्थगिती मागितली आहे. ज्यास प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॉर्नेल विद्यापीठ यासह काही विद्यापीठांनी पाठिंबा दर्शविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button