breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘डिस्को किंगला’ अखेरचा निरोप; गायक बप्पी लाहिरी अनंतात विलीन!

 

मुंबई | प्रतिनिधी 
जवळपास पाच दशके आपल्या संगीताने आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यस्कार करण्यात आले. यावेळी बप्पी दा यांचे कुटुंबीय, चित्रपट सृष्टीतील शक्ति कपूर, इला अरुण, अलका याग्निक, निखिल द्विवेदी, रुपाली गांगुली, मिका सिंह, बिंदु दारा सिंह आदी कलाकार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मुलगा बाप्पा लाहिरी काल रात्री अमेरिकेतून मुंबईत परतला होता. त्यानेच बप्पीदांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता गायक बप्पी लाहिरी यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी दा यांच्या रुपात आणखी एक दिग्गज कलाकार या कलाजगतानं गमावला. यावर बॉलिवूड आणि संगीत जगतातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बप्पी लहरी यांनी १९७० ते १९८० दरम्यान अनेक सुपरहीट गाणी बॉलिवूडला दिली. त्यांना वेगळ्या प्रकारच्या म्युझिकमध्ये फार आवड होती. आज बॉलिवूडमध्ये डिस्को सॉन्ग्स आहेत, तर त्याचं श्रेय बप्पी दा यांना जात असं म्हणायला हरकत नाही. ‘चलते-चलते’, ‘शराबी’ आणि ‘डिस्को डान्सर’ यांसारख्या अनेक गाण्यांवर फक्त बॉलिवूडकरांनी नाही, तर तुम्ही देखील ठेका धरला. त्यांनी संगीतदिग्दर्शन, गायन यासोबतच रिऍलिटी शो साठी परीक्षकाचीही भूमिका बजावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button