TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्र

पुरेशा रस्त्यांचा अभाव, अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही भारतीय शहरांमधली एक प्रमुख समस्या!

प्रसिद्ध वास्तुविशारद आणि नगरविकास विषयाचे तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर बिमल पटेल यांचे मत

पुणे : पुरेशा रस्त्यांचा अभाव, अरुंद रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही भारतीय शहरांमधली एक प्रमुख समस्या असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तुविशारद आणि नगरविकास विषयाचे तज्ज्ञ डॉक्टर बिमल पटेल यांनी शनिवारी पुणे येथे केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरने गोखले इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘नागरीकरण पुनर्विकासाचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना डॉक्टर पटेल यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचे उदाहरण देत रस्त्याचे नियोजन किती उत्तम पद्धतीने करता येते हे एका प्रेझेंटेशन द्वारे स्पष्ट केले. डॉक्टर पटेल यांच्या मते कुठल्याही शहराचे नियोजन करताना आधी इमारती बांधून नंतर रस्ते न बांधता शहराची भविष्यातील व्याप्ती लक्षात घेऊन आधी रस्त्यांचे नियोजन करायला हवे आणि त्यानंतर शहराची उभारणी व्हावी. डॉक्टर पटेल यांनी न्यूयॉर्क शहरातील ग्रीड पद्धतीच्या रस्त्यांचे उदाहरण देत भारतात अशा प्रकारे एकाही शहराचे नियोजन केले नसल्याचे नसल्याची खंत व्यक्त केली.

संसद भवन आणि सेंट्रल विस्टा या प्रकल्पांचा पुनर्विकास, अहमदाबादच्या गांधी आश्रमाचा विकास, वाराणसीच्या श्री काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णद्धार, मुंबई ईस्ट वॉटर फ्रंट चा पुनर्विकास अशा अनेक प्रकल्पांचे नियोजन डॉक्टर पटेल यांनी केले आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स(GIPE )आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या(PIC ) च्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बिमल पटेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे इंटरनॅशनल सेंटर चे प्रोफेसर अभय पेठे होते. पद्मश्री डॉक्टर विमल पटेल अहमदाबादच्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे अध्यक्षही आहेत आपल्या भाषणात ते म्हणाले, भारतीय शहरांचे नियोजन योग्य पद्धतीने केलेले नसल्यामुळे वाहतूकदारांवरही प्रचंड मानसिक ताण येतो. या सगळ्या शहरांचा पुनर्विकास करायचा असेल तर तो अतिशय नियोजनबद्धपणे करावा लागेल. त्यासाठी जगातील उत्तम शहरांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे लागेल.

ते म्हणाले, 19 व्या आणि विसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या काळात लंडन हे शहर सुद्धा राहण्यासाठी अजिबात चांगले नव्हते. जसे रोम हे शहर एका रात्रीत बांधले गेले नाही असे म्हटले जाते, तसेच आपण आपल्या शहरांच्या विकासाबाबत उतावीळ होऊन चालणार नाही.

ज्या शहरांना आपण उत्तम नियोजनाचे आदर्श मानतो ती शहरे विकसित करण्यासाठी अनेक दशकांचे सुनियोजित प्रयत्न करावे लागले आहेत. आपल्या शहरांच्या पुनर्विकासाचा विचार करताना सायकल ट्रॅक सारख्या अतिरंजीत कल्पना राबविण्याऐवजी मूलभूत समस्यांचा विचार आधी करायला हवा जो पाश्चात्य राष्ट्रांनी अनेक दशकांपूर्वी केला.

या पुढील काळात शहरीकरणाला पर्याय नसल्यामुळे केंद्र सरकारने सुनियोजित शहरीकरणावर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन प्रोफेसर पेठे यांनी केले. पी आय सी चे संचालक अभय वैद्य यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भ्रष्टाचाराला सामान्य नागरिक कंटाळले आहेत. आपल्या देशाच्या राजधानीचा परिसर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुलांना सायकल वापरायला निश्चितच आवडेल परंतु त्यासाठी योग्य रस्ते पुरवण्यास आपले प्रशासन असमर्थ आहे.” ते म्हणाले,” स्वच्छ भारत आणि सुलभ शौचालय या योजनांनी काही शहरांमध्ये फरक पडत असला तरी पुण्यासारख्या शहरात सुद्धा अद्यापही सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय शोचनीय आहे.” पुणे इंटरनॅशनल सेंटर पीआयसी पुणे इंटरनॅशनल सेंटर ही एक स्वायत्त थिंक टॅंक संस्था आहे.

देशाच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक दिशा देण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक नवनिर्माण ऊर्जा, पर्यावरण, वातावरणीय बदल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आर्थिक सुधारणा आणि शहरीकरण या विषयावर काम करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button