breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

# CORONAVIRUS: जीवनाश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेमधील वाहतुकीस अडथळा नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

– नागरिकांनी देखील सूचनांचे पालन करीत गांभीर्य ठेवावे – मुख्यमंत्री

मुंबई। महाईन्यूज ।प्रतिनिधी

जीवनाश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेमधील वाहतुकीस अडथळा करु नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, पहिल्या प्रथम मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आमच्या विनंतीनुसार  आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी  परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे त्यासाठी आभार. अजूनही सकाळी परत एकदा लोक गर्दी करताहेत असे चित्र आहे. ठीक आहे जीव्नाव्शाय्क वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी बाहेर यावे लागणार आहे पण आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसाना देखील यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.  अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी. 

पोलिसांनी विनाकारण अडवणूक करु नये…

सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार  ने आण करणारी वाहने अडवली गेली नाही पाहिजे अशा सुचना मी दिल्या आहेत. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावीत. अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करा. कालच पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले त्यासाठी त्यांचे अभिनंदन, या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button