breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कृष्‍णा नागर याने घडवला इतिहास, बॅडमिंटनमध्‍ये सुर्वण पदकाला गवसणी

टोकियो – टोकिया पॅरालिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्‍या अंतिम सामन्‍यात कृष्‍णा नागरने इतिहास घडवला. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात कृष्‍णा नागर याने हाँगकाँगच्‍या शू मान कायशीचा पराभव करत सुवर्ण पदकावर मोहर उमटवली. पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेतील भारताची ही आजवरची सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी ठरली आहे. खेळाडूंनी उत्‍कृष्‍ट कामगिरी करत तब्‍बल १९ पदकांवर आपले नाव काेरले आहे.

टोकियो पॅरालिम्‍पिक स्‍पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपली विजयाची घाैडदाैड कायम ठेवली. पुरुष एकेरी बॅडमिंटनस्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात कृष्‍णा नागर दमदार प्रदर्शन करत हाँगकाँगच्‍या शू मान कायशीचा २-१ असा पराभव केला.

आयएएस सुहास यशिराज यांची रौप्‍यपदकावर मोहर
बॅडमिंटन स्‍पर्धेत सुहास यथिराज यांनी उपांत्‍य फेरीत इंडोनेशियाच्‍या फ्रेडी सेटियावानवर २१-९,२१-१५ असा विजय मिळवत अंतिम सामन्‍यात प्रवेश केला होता.यावेळी भारताचे आणखी एक पदक निश्‍चित झाले होते.अंतिम सामन्‍यात सुहास यथिराज यांनी फ्रान्‍सव्‍या ल्‍युकास मझूर याला कडवी झुंज दिली.मझूर याने २१-१५, १७-२१ आणि १५-२१ असा सामना जिंकला.बॅडमिंटन स्‍पर्धेत राैप्‍यपदकाला गवसणी घालणारे सुहास यतिराज हे गौतमबुद्‍ध नगरचे जिल्‍हाधिकारी आहेत.पॅरालिम्पिकमध्‍ये पदक पटकावणारे ते पहिले आयएएस ठरले आहेत.

भारताची आजवरची सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी
टोकिया पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत १९ पदकांवर मोहर उमटवली आहे.या स्‍पर्धेतील ही आजवरची सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button