breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोयना, चांदोली धरणे भरण्याच्या मार्गावर

सांगली |

गेल्या चार दिवसापासून पश्चिम घाटात पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोयना धरणात १०२ टीएमसी पाणी साठा झाला असून चांदोली धरण काठोकाठ भरण्याची केवळ औपचारिकताच उरली आहे. जिल्हयात मात्र पावसाचा जोर ओसरला असून आता रब्बी हंगामासाठी परतीच्या मान्सूनकडे नजरा लागल्या आहेत. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली असून ती भरण्याच्या जवळ आली आहेत.

गेल्या चार दिवसापासून पश्चिाम घाटात पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर कोयना, चांदोलीसह राधानगरी, दूधगंगा धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. कोयना धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला असून साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. ३४.४० टीएमसी क्षमतेच्या चांदोली धरणामध्ये ३४.३५ टीएमसी पाणी साठले आहे. धरण काठोकाठ भरण्यास केवळ ०.०५ टीएमसी पाणी कमी असून धरणातून २ हजार ३२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याचे पूर नियंत्रण कक्षातून शनिवारी सांगण्यात आले.

कोयना धरण देखील भरण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी दिवसभरात पाऊण टीएमसी तर, गेल्या २४ तासात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली. कोयना शिवसागराचा पाणीसाठा दीड महिन्यात सुमारे १७ टीएमसीने वाढून आज शनिवारी तो १०२ टीएमसी (९६.९१ टक्के) झाला आहे. आज सकाळी आठ ते सांयकाळी पाच या नऊ तासांच्या कालावधीत कोयना पाणलोटात २१ मि.मी. एकूण ४,७८८ मि.मी. (वार्षिक सरासरीच्या ९५.७६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, घोड, खडकवासला वगळता पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक धरणे तुडुंब भरलेली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button