TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

 देवतांचा रक्तगट माहितीये? जगभरात अवघ्या 45 लोकांकडे आहे ‘हा’ गोल्डन ब्लड ग्रुप

तुम्ही कधी रक्तदान केलंय का? रक्तदानाची व्याख्याच महादानाशी संबंधित आहे. या एका दानानं तुम्ही कोणाचातरी जीव वाचवता, ही भावनाच किती सुखावणारी आहे. म्हणूनच म्हणतात, की जीवनात एकदातरी रक्तदान करावं. तुम्हाला माहितीये का, मानवी शरीरात रक्त जरी एका रंगाचं असलं तरीही ते एकाच प्रकारचं नसतं. आतापर्यंत आपण ऐकलं असेल की सहसा मानवी रक्ताची विभागणी A+, A-, B+, B-, O+, O-, AB+, AB- या गटांमध्ये (Blood Group) केलेली असते. पण, आता यात आणखी एका रक्तगटाची भर पडली आहे. शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांच्या मते हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगट असून त्याचा उल्लेख Rarest Blood Group म्हणून करण्यात आला आहे.

काय आहे गोल्डन ब्लड ग्रुप?

सायंन्स म्युझियम ग्रुपमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालुसार प्राचीन ग्रीसमध्ये अशी धारणा होती, की देवतांच्या शरीरात सोनेरी रक्त वाहतं. थोडक्यात सोन्याचं रक्त . इकर, असा त्याचा उल्लेख होत होता. हा द्रव त्यांना अजरामर ठेवू शकत होता. पण, सर्वसामान्य व्यक्तींच्या शरीरात मात्र हा द्रव विषारी समजला जात होता.

961 मध्ये पहिल्यांदाच गोल्डन ब्लड, अर्थात सोनेरी रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला. अतिशय दुर्मिळ असल्यामुळं या रक्तगटाला Golden Blood Group चं नाव देण्यात आलं. बराच काळ हे संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. पण, आता जेव्हा संपूर्ण जगासमोर या रक्तगटाची माहिती पोहोचली आहे, तेव्हा अनेकांचेच डोळे विस्फारत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button