breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी केळवे पोलिसांच्या ताब्यात

पालघर – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी याला केळवे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर तालुक्यातील एडवण येथील दोन तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी गोसावी विरोधात केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केळवे पोलिसांनी रात्री उशिरा किरण गोसावी याला ताब्यात घेतले आहे.

पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांची त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केली होती. या दोघांना मलेशिया येथे कामाला लावतो,असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपये गोसावीने उकळले. हे दोन तरुण दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावीची त्यांच्याशी सुरुवातीला फेसबुकवरून मैत्री झाली. या दोघांना मलेशियाला कामाला लावतो, असे सांगितल्यानंतर दोघांकडून गोसावीने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावीच्या के.पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. त्यानंतर त्याने दोघांनाही विमानाचे तिकीट व व्हिजा दिला. मात्र कोचीन विमानतळावर पोहोचल्यावर विमानाचे तिकीट व व्हीजा बोगस असल्याचे समजले. या तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता. मात्र पोलिसांनी त्यांचा तक्रारी अर्ज तसाच धूळ खात ठेवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button