breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या आमदार पुत्राकडून अपहरण, खूनाचा प्रयत्न

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदाराच्या सुपरवायजरने बुधवारी (दि.१२) गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर आणखी दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी (दि.११) आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याने त्याच्या साथीदारांसह ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून काही जणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तसेच बुधवारी ठेकेदाराच्या सुपरवायझरचे अपहरण करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, त्यांचे पीए व इतर आठजण यांनी मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेबाराला एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात शिरून कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपींनी कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीने घुसून धनराज बोडसे, अमोल कुचेकर यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर तानाजी पवार कुठे आहे’ अशी विचारणा केली. तानाजी पवार यांच्याबाबत माहिती नसल्याचे ऑफिसमधील लोकांनी सांगितले असता ऑफिसमधील आयटी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी सारख्या शस्त्राने डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण याला ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड या कंपनीचे ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यासाठी सांगून तानाजी पवार यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या घटनेप्रकरणी एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी) यांनी पिंपरी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. ११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज आरोपींचा झाला. त्यातून १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी अपहरण केले. त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणले. तिथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान व साथीदारांनी हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तर बुधवारी आमदार बनसोडे यांच्यासह त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवार काम करत असलेल्या कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरीस घ्यावे आमदार अण्णा बनसोडे यांनी चर्चेसाठी पवार याला बोलावले. बुधवारी (ता. १२) दुपारी पवार त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देत आरोपीने आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार बनसोडे व तानाजी पवार यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये पवार यांना शिविगाळ करण्यासह धमकी दिल्याचे समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button