breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अपघातानंतर वॉकरच्या सहाय्याने जयकुमार गोरेंची अधिवेशनाला हजेरी

मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनासाठी हजर

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनासाठी माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे वॉकरच्या सहाय्याने विधानमंडळामध्ये दाखल झाले.

डिसेंबर महिन्यात फलटण तालुक्यात पहाटेच्या वेळी त्यांची कार पुलावरून खाली ३० फूट खाली कोसळली होती. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असूनही ते आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनासाठी हजर झाले आहेत.

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की, मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादानं पुनर्जीवन मिळालं आहे. आता जनतेच्या प्रश्नावर काम करायचं ठरवलं आहे. गेल्या अडीच वर्षापासून विकासाची कामे थांबली आहेत. भाजपाचा आमदार होतो म्हणून महाविकासआघाडीने कामं थांबवली होती. आता आमचं सरकार गेल्या सहा महिन्यांपासून चांगले निर्णय घेतले आहेत. मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न मार्गी लागतील, असं जयकुमार गोरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button