Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

जळगाव : जडीबुटीची औषधींची विक्री करणाऱ्या दुकानात मंगळवारी वन विभागाच्या पथकाने छापा ; कारवाईत दुकानातून असं काही समोर आलं की …

जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील भवानी पेठेतील जडीबुटीची औषधींची विक्री करणाऱ्या दुकानात मंगळवारी वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत दुकानातून असं काही समोर आलं की पोलीसही हादरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुकान होतं जडीबुटींचं पण यात मात्र वन्य जीवांचे अवशेष आढळून आले असून दुकान मालकासह दोन जणांना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. वन्यप्राण्यांची शिकार व तस्करी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अजय लक्ष्मीनाराण कोगटा (वय-५३) रा. जळगाव, चुनीलाल नंदलाल पवार (वय-३०) रा. खेडागाव तांडा. ता. एरंडोल आणि लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय-५४) रा. जळगाव अशी अटकेतील संशयितांची नावे आहे.

जळगाव शहरातील भवानी पेठेतील मे. रामनाथ रामनाथ मुलचंद कोगटा या वनऔषधी व जडीबुटीच्या दुकानात वन्यजीवांची शिकार करून वन्यजीवांच्या अवशेषाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी दुकानावर छापा टाकला.

कारवाईत या दुकानात हताजोडी, रानमांजर रंगनी, सियारसिंगी, कासवपाठ, इंद्रजाल, नाग मणके, घुबळ नखे, समुद्रघोडा या वन्यजीवांचे अवशेष मिळून आले असून ते वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहे. या प्रकरणी दुकानमालक डॉ. अजय लक्ष्मीनाराण कोगटा (वय-५३) रा. जळगाव, चुनीलाल नंदलाल पवार (वय-३०) रा. खेडागाव तांडा. ता. एरंडोल आणि लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय-५४) रा. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्या आले. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करीत आहे. दरम्यान या दुकानात गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत असून भरवस्तीतील प्रसिध्द दुकानात केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button