breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

किम जोंग उनच्या प्रकृतीबद्दल उत्तर कोरियाचा मोठा खुलासा

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती उत्तर कोरियाकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वीही किम जोंग उनच्या मृत्यूचं वृत्त उत्तर कोरियानं फेटाळलं होतं.

“किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत,” अशी माहिती उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सीएनएनशी बोलताना दिली. तसंच उत्तर कोरियाचं संस्थापक आणि त्यांचे आजोबा यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आलं होतं. १५ एप्रिलचा दिवस हा उत्तर कोरियाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या हातून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत या दिवशी होणारा कार्यक्रम कधीही चुकवला नव्हता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button