breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : राजस्थानची विजयाची हॅट्रिक हुकली! कोलकाताचा रॉयल विजय

दुबई – आयपीएलच्या १३व्या मोसमात काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने अलगद विजय मिळवला. कोलकात्याने ठेवलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानची धुळधाण उडाली. अखेर राजस्थानला २० षटकांत केवळ १३७ धावांवर मजल मारता आली. त्यामुळे या सामन्यात कोलकाताने सलग २ सामने जिंकणाऱ्या राजस्थानचा ३७ धावांनी एकतर्फी पराभव केला. कोलकाताच्या या विजयाचा हिरो शिवम मावी ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकत राजस्थान संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने निर्धारित २० षटकांत ६ विकेट्स गमावत १७४ धावा केल्या. या आव्हानच पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाकडून टॉम करनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूंत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. यात २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सोबतच सलामीवीर फलंदाज जॉस बटलरने २१ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाज राहुल तेवतियाव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. तर कोलकाताकडून गोलंदाजी करताना शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. सोबतच सुनील नरेन, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.

तसेच प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाकडून सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ४७ धावा केल्या. यात १ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. त्यानंतर ऑयन मॉर्गनने ३४ धावा केल्या. सोबतच आंद्रे रसेल (२४) आणि नितीश राणा (२२) हे फलंदाज सोडले, तर इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. तर राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. सोबतच अंकित राजपूत, जयदेव उनाडकट, टॉम करन आणि राहुल तेवतिया या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button