breaking-newsराष्ट्रिय

iPhone चोराला पकडण्यासाठी इंजिनिअरने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि….

हातातला आयफोन खेचून पळणाऱ्या चोराला पकडण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारणाऱ्या २७ वर्षीय इलेक्ट्रीकल इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या उलुबेरिया स्थानकात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्याआधीच या इंजिनिअरचा मृत्यू झाला. मूळचे जमशेदपूरचे असणारे सौरभ घोष शनिवारी संबलपूर एक्सप्रेसने आपल्या घरी निघाले होते.

डब्ब्याच्या अखेरीस खिडकीजवळ ते बसले होते. रात्री ११ च्या सुमारास ट्रेन उलुबेरिया स्थानकात थांबली. त्यावेळी ते नवीनच विकत घेतलेल्या आयफोनवरुन कोणाबरोबर तरी बोलत होते. ट्रेन सुरु होताच त्या डब्ब्यात आधीपासूनच असलेल्या एका व्यक्तीने सौरभ यांच्या हातातल आयफोन हिसकावला व उडी मारुन पळ काढला. काही क्षणांच्या आत घडलेल्या या प्रकाराने सौरभ घोष यांना धक्का बसला. त्यांनी चोराचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला.

धावत्या ट्रेनमधून उडी मारताच सौरभ घोषण जमिनीवर आदळले. त्यांचे डोके दगडावर आपटले व ते जखमी झाले. स्थानिक आणि जीआरपी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सौरभ यांना उलुबेरिया येथील स्थानिक रुग्णालयाचा नेण्याआधीच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. जमशेदपूरमधून इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर सौरभ घोष कोलकात्यात बावुरीया येथे एका कारखान्यात नोकरीला लागले होते. सौरभ घोष व्यावसायिक जीवनात यशस्वी होते. ते टप्याटप्याने यशाची शिडी चढत होते. कारखान्यात दोन युनिटसची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मुकूंदापूर येथे फ्लॅट विकत घेऊन तिथे त्यांनी राहण्यास सुरुवात केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आवड असणाऱ्या सौरभ घोष यांनी १५ दिवसांपूर्वीच नवीन आयफोन विकत घेतला होता. या फोनच्या फिचर्सचे त्यांना विशेष कौतुक होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button