Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मनसेच्या मुंबईतील मेळाव्याला वसंत मोरे यांना निमंत्रण, राज ठाकरे काय बोलणार?

मुंबई: मनसेतील अंतर्गत धुसफुस आता काही कोणापासून लपलेली नाही. पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना इतर पदाधिकारी साईडलाईन करू पाहाताय, असं स्पष्ट चित्र पुण्यात आहे. खुद्द वसंत मोरेंनीही ते अनेकदा बोलून दाखवलं. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या आयोजनातही वसंत मोरे कुठेही दिसले नव्हते. त्यानंतर राज ठाकरे आज मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीचं निमंत्रण वसंत मोरेंनाही पाठवण्यात आलं आहे. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा  सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मेळाव्याला वसंत मोरे येणार का? आणि आले तर ते राज ठाकरेंपुढे त्यांच्या तक्रारी मांडणार का?, हा प्रश्न आहे.

पुणे मनसेत अंतर्गत वाद

गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि पुणे मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. मनसेतील एका गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरे आल्याशिवाय मनसेच्या पुणे शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यातील सभेपूर्वी राज ठाकरेंशी चर्चा करणार असं सांगितलं होतं. मात्र, काही कारणास्तव ही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आजच्या पदाधिकारी मेळाव्यात वसंत मोरे त्यांची भूमिका राज ठाकरेंपुढे मांडण्याची शक्यता आहे.

‘पार्ट टाईम’ नेत्यांकडून वसंत मोरेंची टीम संपवण्याचा प्रयत्न?

“पुण्यातील मनसेचे काही ‘पार्ट टाईम’ नेते वसंत मोरे (Vasnat More) याने बांधलेली टीम संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहर कार्यालयात बसणारे नेते फर्स्टेट होऊन काम करत आहेत. मी शहराध्यक्ष असताना कधीही फर्स्टेट झालो नव्हतो. माझ्याविषयी गैरसमज आणि अफवा पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत”, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

वसंत मोरे हे पक्षातून बाहेर पडणार?

वसंत मोरे हे पक्षात नाखूश आहेत, पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे खटके उडतात, वसंत मोरे पक्षातून बाहेर पडणार, अशा चर्चा सातत्याने सुरु आहेत. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी वेळ दिली होती. मात्र, वसंत मोरे यांना न भेटताच राज ठाकरे हे पुण्यातून माघारी परतले होते. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेत राहणार किंवा नाही, याबाबतच्या शंका-कुशंका आणि चर्चा होऊ लागल्या होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button