TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मृतदेहाची अदलाबदल प्रकरणाची चौकशी करा : मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क मृतदेहाची अदलाबदल झाली होती. ही घटना अतिशय निंदनीय असून झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे.
यासंदर्भात सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील शव विच्छेदन विभागात चुकीच्या पध्दतीने कामकाज चालत असल्याची बाब समोर आली आहे. ती माणुसकीला काळीमा फासणारी असून त्याचा मनसेतर्फे जाहीर निषेध करीत आहोत.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय 57, रा. दापोडी) या भींत कोसळून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे शव वायसीएम रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये आणण्यात होते. विच्छेदन करतेवेळी त्याठिकाणी तीन महिलांचे मृतदेह असल्याची माहिती समोर आली आहे.
शव विच्छेदन केल्यानंतर आज बुधवारी (दि.19) सकाळी अंत्यविधी करण्यासाठी स्नेहलता यांचे शव घेऊन जाण्याकरिता त्यांचे नातेवाईक आले होते. त्यांना स्नेहलता यांच्याऐवजी अनोळखी महिलेचे शव ताब्यात देण्यात आले. प्रशासनाकडून मृतदेहाची हेळसांड करण्यात आली. त्याठिकाणी स्नेहलता यांचे शव नसल्याची बाब समोर आल्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
स्नेहलता यांचे शव कोणी गायब केले ?, याचा तपास करण्यात यावा. यामागे प्रशासकीय षडयंत्र असल्याचा संशय बळावत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. वायसीएम रुग्णालय तसेच शव विच्छेदन विभागातील संबंधित अधिका-यांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा गायकवाड कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आपल्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असे सचिन चिखले यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button